वर्धा : घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानिसक छळ करणा-या पतीसह पाच जणांविरुद्ध गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना गिरड पोलिसांनी ५ एप्रिलला रात्री ११ वाजता अटक केली आहे.
Read Me: भामरागड हादरलं! सरपंचाच्या मुलाने प्रेम प्रकरणातून प्रेयसीला संपविले
सविस्तर वृत्त असे की, नालवाडी वर्धा येथील मुलीचे गिरड येथील आशुषोत प्रमोदकुमार पाठक याच्यासोबत रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नामध्ये नव-या मुलाला एक बुलेट मोटारसायकल २.२० लाख रुपये, साडेपाच तोळे सोने (किंमत २.२० लाख रुपये), भांडी व फर्निचर ६ लाख रुपये तसेच, रोख २ लाख असे १२ लाख ४० हजार रुपये हुंडा स्वरुपात दिले. सदर स्त्रीधन आरोपीने स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर लग्नाच्या २० दिवसानंतरच विवाहितेला घराचे बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्याकरिता शारीरिक व मानसिक त्रास दिला. सदर विवाहितेला पती, सासरे, सासू, नणंद व नंदई यांनी अश्लिल भाषेत शिविगाळ केली. ननंद पौर्णिमा हिने पायाने पोटावर वारंवार मारून अपमानित केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.
Read Me: ब्रम्हपुरी: लाचखोर वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
या प्रकरणी बरखा आशुतोष पाठक (वय २२) रा. नालवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती आशुतोष प्रमोदकुमार पाठक, प्रमोद सुरेंद्र पाठक, साधना प्रमोद पाठक तिन्ही रा. गिरड, पोर्णिमा शैलेश तिवारी, शैलेश तिवारी (रा यशोदा नगर) राजापेठ अमरावती या पाच जणांविरुद्ध गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास गिरड पोलिस करीत आहेत.