तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Petrol Price Hike in India: महागाईचा आगडोंब! मागील सतरा दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरांत १५ वेळा दरवाढ, आज पेट्रोल व डिझेलच्या दरात ८० ते ८५ पैशांनी वाढ, महागाईमुळं जनता त्रस्त

New Delhi,Delhi,Delhi News,IndiaNews,India Petrol-diesel prices,Petrol Price Hike in India,

New Delhi,Delhi,Delhi News,IndiaNews,India Petrol-diesel prices,Petrol Price Hike in India,

नवी दिल्ली
: देशातील पाच राज्यातील निवडणुका होताच पेट्रोल डिझेल व महागाईचा आगडोंब होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, तो अंदाज खरा ठरत आहे. पेट्रोल-डिझेल दरात मागील १७ दिवसात १५ वी वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल डिझेल ८० ते ८५ पैशांनी महागलं आहे. दिल्लीमध्ये पेट्रल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल प्रति लिटर ८५ पैशांनी महागले आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०५.४१ वर पोहेचले आहे. तर मुंबईमध्ये गुरुवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर १२०.५१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. तर डिझेल १०४.७७ रुपये प्रति लिटर झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम पेट्रोल – डिझेलच्या किमतींवर होत आहे. पेट्रोल-डिझेल दरात मागील सतरा दिवसात १५ वी वाढ झाली आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर २२ मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ १७ दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. २२ मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० ते ११ रुपयांनी महागलं आहे. तसेच सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.

Read Meमहागाईचा आगडोंब! वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक आज देशभरात आंदोलन, रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा निषेध करणार

दरम्यान, जीवनावश्यक वस्तुसह गॅस, सीएनजी पेट्रोल व डिझेल यांच्या दिवसागणिक महागाईमुळं जनता त्रस्त झाली असून, पाच राज्यातील निवडणुका होताच महागाईंन डोक वर काढलं आहे. त्यामुळं वाहनदार तसेच सामान्य जनता मेटकुटीस आली आहे. गाड्या चालवायच्या की नाही असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

पेट्रोल व डिझेलचे दर कुठे व कसे पाहाल?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. किंवा इंडियन ऑईलचं IndianOil One Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. किंवा वेबसाईटवरुन सुद्धा माहिती मिळवू शकता

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.