'
30 seconds remaining
Skip Ad >

महागाईचा आगडोंब! वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक आज देशभरात आंदोलन, रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा निषेध करणार - Batmi Express

0

New Delhi,Delhi,Delhi News,India,India News,

नवी दिल्ली :
जीवनावश्यक वस्तु, सीएनजी, गॅस तसेच पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत दररोज होणार वाढ यामुळं सामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे असा प्रश्न जनतेला पडला आहे. महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून मुंबईत महागाई तसेच केंद्र सरकारविरोधात काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करत विशाल मोर्चा काढला. दरम्यान मार्च ते एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतरा वेळा वाढल्या आहेत. यात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यापार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलने सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस आजही देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. तसेच केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.

बुधवारी देशातील विविध राज्यात काँग्रेसनं महागाई विरोधात आंदोलन केले. मुंबई तसेच हरियाणातील भिवानी येथे युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात निदर्शने केली. हंसी गेट येथे युवा काँग्रेसच्या आंदोलकांनी भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. लखनौ येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रवक्त्यांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. ते म्हणाले की, ६२ कोटी अन्नदाते कराच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. रोज सकाळी पंतप्रधान तेलाच्या किमती वाढवून देशातील जनतेला गुड मॉर्निंगचा संदेश देतात. गेल्या १७ दिवसांत त्यांच्या किमती १५ वेळा वाढल्या आहेत. आधी कोरोना आणि आता महागाई त्यामुळं जनता मेटाकुटीला आली असून, महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेसमोर जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुमार यांनी सरकारला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याचे आवाहन केले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून जनतेची लूट करण्यात मग्न असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास कुमार यांनी केला. त्यामुळं आज देशभरात केंद्र सरकार व महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×