Chandrapur:- मागील तब्बल दोन वर्षांपासून ब्रम्हपुरी ते वडसा महामार्गावरील भुती नाल्यावरील इंग्रजकालीन पूल जीर्ण झाल्याने नव्या पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. अश्यातच ये-जा करण्यासाठी भुती नाल्याच्या बाजूला वळण मार्ग म्हणून तात्पुरता रपटा (कच्चा रस्ता) तयार करण्यात आला होता.
मात्र, दोन दिवसांपासून दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुरी-देसाईगंज महामार्गावरील रपटा वाहून गेल्याने मार्गावरील जड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यातच दुचाकी धारक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. पर्यायी मार्गावर लहान पूल असल्याने अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करू लागलेत. त्यामुळे एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या स्थितीत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढून परत पुन्हा संपूर्ण मार्ग बंद पडू शकतो. पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकी वा इतर वाहनांनी रस्ता ओलांडू नये,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असले तरीही काहीजण जीव धोक्यात टाकून याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.
सोर्स : सोशल मीडिया