गडचिरोली :- सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आज, मंगळवार 8 जुलै रोजी पुरामुळे सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील 10 मार्ग बंद झालेले असून पुनः काही मार्ग बंद होण्याच्या स्थितीवर असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये, अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
ही मार्ग पुरामुळे बंद बंद:
- कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग 362 ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
- कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग 314 तालुका कोरची (भीमपूर नाला)
- कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका कुरखेडा
- मांगदा ते कलकुली प्रजिमा 50
- कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
- चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
- गोठनगाव -चांदागड-सोनसरी रस्ता प्रजिमा 38 तालुका कुरखेडा
- कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा 46 तालुका कुरखेडा
- आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा 32 (सती नदी)
- शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज