भंडारा: मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 33 गेट 1 मीटरणे उघडण्यात आले असून 2 लाख 85 हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होत.आज दिनांक 8 जुलै सकाळच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आल आहे. 33 पैकी 9 दरवाजे दीड मिटरणे तर 24 दरवाजे 1 मिटरणे उघडण्यात आल आहेत. धरणातून साडेतीन लाख पेक्षा जास्त क्युसेस पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट तर आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात हवामान विभागाकडून देण्यात आल आहे. मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यात वैनगंगा तर अहेरी, सिरोंचा या तालुक्यात प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.