'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी: लाचखोर वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Be Chandrapur

0
Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Crime,

ब्रम्हपुरी
:- येथील मत्सव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक वर्षा श्रीहरी मगरे (३६) यांना चार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले असून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
तक्रारदार हे असोलामेंढा येथील मत्स्यबीज केंद्रात सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांचे मुख्यालय सावली तालुक्यात येते. सावली तालुका हा नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे तक्रारदारास अनुज्ञेय वेतन श्रेणीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू करून मिळणे आवश्यक होते. परंतु त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांनी ११ जानेवारी २०२२ रोजी सदर बाब ब्रह्मपुरी येथील मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासंबंधाने कार्यालयीन पत्रव्यवहार सुद्धा केला.


तेव्हा १४ फेब्रुवारी २०२२ रोजी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत व वेतनाच्या फरकाची रक्कम मिळणेबाबत तसेच केलेल्या पत्रव्यवहारबाबत काय कार्यवाही झाली हे विचारपूस करण्याकरता मत्सव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात तक्रारदार गेले असता सदर कामाकरता तक्रारदारांना वर्षा मगरे यांनी साडेचार हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वर्षा मगरे यांना तक्रारदाराकडून तडजोडी अंती ठरलेली चार हजारांची रक्कम ब्रह्मपुरी येथील मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात स्वीकारतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×