मोहफुल गोळा करणे बेतले जीवावर... मोहफूल गोळा करणाऱ्या इसमाला वाघाने केले ठार...!

Be
0

Lakhandur News,Lakhandur,Bhandara,Bhandara Live,Bhandara Today,Tiger Attack,Bhandara Batmya,Bhandara News,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार


भंडारा
:- जिल्ह्यातील गांव - इंदोरा (सोनी) तालुका - लाखांदूर येथील जयपाल कुमरे वय-४२ वर्षे,सदर इसम सकाळच्या सुमारास उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मोहफुल गोळा करण्याकरिता गेला असता वाघाने ठार केले असल्याची घटना घडली आहे. वाघाने ठार झालेल्या व्यक्तितील कुटूंबास संबंधित विभागाकडून वा शासनाकडून केवळ पैस्याचे आमिष दाखविले जात असल्याने वाघापेक्षा मानवी जीवन कवडीमोल झाले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. 

Read Me: अपघात ब्रेकिंग! ॲड. निनाद येरणे यांच्या कारला अपघात 

सर्वसामान्य जनता रोजची रोजी-रोटी कमावण्याकरिता व आपले उदरनिर्वाह करण्याकरिता मिळेल ते काम वा इतर कामे करून पोट भरण्यासाठी धडपड करीत आहेत. अशातच आदिवासी बांधव वा इतर सर्वसामान्य नागरिक ऋतुप्रमाणे उदरनिर्वाहाचे साधन शोधून कुटुंबातील व्यक्तींचा गुजारा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मोहफुल 'गोळा करणे व जीवावर बेतने' अशा घटना वारंवार घडत असल्याने वाघापेक्षा मानवी जीवन कवडीमोल व वाघाचे संरक्षण सर्वात महत्त्वाचे दिसून येत आहे.

सर्वसामान्य जनतेचे जीवन वाघापेक्षा कमी न लेखता सर्वात अगोदर मनुष्यजात महत्वाचे आहे.पैसा आज आहे नी उद्या नाही.मात्र मनुष्यांचे जीवन हे जीवन आहे.वनविभागाने याकडे दुर्लक्ष न घालता सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाघांमुळे धोक्यात वा एखादा इसम वाघाच्या हल्ल्यात ठार होऊ नये याकडे लक्ष घालणे महत्वाचे असल्याचे सूर सर्वसामान्य नागरिकांतून निघू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->