पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १६ दिवसांत १० रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी सांगितलं की, रशिया-युक्रेन युद्धानंतर भारतात पेट्रोलच्या किमतीत केवळ ५ टक्के वाढ झाली आहे. अनेक विकसित देशांमध्ये त्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.