'
30 seconds remaining
Skip Ad >

Amravati Big Accident: अमरावती – यवतमाळ मार्गावर बस आणि ट्रक मध्ये जबर धडक, १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू तर २४ जण गंभीर जखमी - Batmi Express

0

Amaravati,Amaravati Live,Amaravati News,Amaravati Accident,Accident,Accident News,Accident News Live,Yavtmal,

अमरावती : अमरावती – यवतमाळ मार्गावर बस व ट्रकची जबर धडक झालेली आहे. या भीषण अपघातात १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर, २४ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. यातील ६ जखमी लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नांदगाव खंडेश्वरजवळील शिंगणापूर चौफुलीवर झालेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बस चक्क रस्त्याच्या खाली घुसल्या जाऊन रस्त्याच्या कडेला गेली  आहे. त्यामुळे प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

Read Me: मोहफुल गोळा करणे बेतले जीवावर... मोहफूल गोळा करणाऱ्या इसमाला वाघाने केले ठार...!

यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून ही बस अमरावतीला प्रवासी घेऊन निघाली असतांना या बसचा अपघात झाला आहे. जखमी प्रवाशांना तात्काळ  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बस चांगलीच चपकल्या गेली आहे. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. तर येथील प्रवासीही गंभीर जखमी झाले आहे. तर, या अपघातात  ट्रकचा समोरचा भाग चांगलाच चपकला असून ट्रकचे बरेच नुकसान झालेले आहे. एवढ्या मोठ्या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×