'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपुरात गोळीबार! चंद्रपूरमध्ये भर दिवसा गोळीबार, एक जण जखमी | Chandrapur Crime News

0

चंद्रपुरात गोळीबार!
Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढतच होत आहे. गुन्हेगारांना आता पोलिसांचा सुद्धा भय राहीलच नाही आहे. अशा दररोजच्या वाढते गुन्हेगारीला बघता जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण होउ लागली आहे.

चंद्रपूर मध्ये आज दुपारी अशीच एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका हॉटेलमध्ये बुरखाधारी व्यक्तीने घुसून केला गोळीबार.. यामुळे सगळीकडे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील एका हॉटेलमध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. इथे भर दुपारी हॉटेल मध्ये घुसून एका अनोळखी बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात आलेवार नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान चंद्रपुरात गोळीबार सुरु असतांना हॉटेलमध्ये असणारे सर्वच जण आपलं जीव वाचवण्यासाठी जिथं तिथं लपून बसले होते. हॉटेलमधील हा गोळीबार सर्वानीच आपल्या डोळ्यांनी बघितल, या गोळीबारात जखमी व्यक्ती आपलं जीव वाचविण्यासाठी मोबाईलच्या दुकानात जाऊन लपल्यामुळे थोडक्यात बचावला. पण ह्या गोळीबारात तो व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा:  Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आत्महत्यांचा वीस वर्षातील उच्चांक

गोळीबार एका बुरखाधारी व्यक्तीने केला होता. पण नक्की गोळीबार कोणी केला याविषयी अजनूही ठोस माहिती पुलिसांना मिळालीच नाही. 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटना स्थळी पोहचले व जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी पोहचले. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×