दुर्दैवी घटना! चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या... #Suicide | बातमी एक्सप्रेस

Be
0

फोटो बातमी दर्शवते : फोटो फाईल-दिव्यमराठी

चामोर्शी
तालुका वरून ८ की.मी. अंतरावर असलेल्या कान्होली या गावात आज सुरभी प्रणित बारसागडे (वय २५) व तीची मुलगी प्रिशा प्रणित बारसागडे (वय दीड वर्ष) च्या चिमुकलीसह दोन्ही मायलेकीने भेंडाळा जवळील शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चामोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत भेंडाळा बिटात आज घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

भेंडाळा पासून अगदी जवळ असलेल्या कान्होली गावात. राहणारे पौर्णिमा उत्तम बारसागडे यांचे दोन मुलांचे कुटुंब संयुक्त रित्या राहत आहेत प्रणित बारसागडे यांची पत्नी सुरभी प्रणित बारसागडे वय २३ ,व मुलगी प्रीशा प्रणित बारसागडे वय दीड वर्ष ह्या. अंदाजे पाच दिवसांपासून घरून निघून गेले. याबाबत त्यांचाकुटुंबियांनी ७ जुलै रोजी मुलीसह बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी पोलीस स्टेशनला दिली होती.

शोधाशोध सुरू असतानाच मात्र आज ९ जुलै रोजी भेंडाळा येथील पोलिस पाटील यांच्या शेतशिवारातील विहिरीत दोघांचे प्रेत तरंगत असल्याची माहिती पोलिस पाटील यांच्या मुलास शेतात गेल्यानंतर आढळून आले सदर माहिती पोलिस पाटिल यांनी चामोर्शी पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील,पोलिस उपनिरक्षक निशा खोब्रागडे , पोलीस हवालदार जमपलवार, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर लाकडे यांचा पथक घटनस्थळी दाखल झाले असून पोलिस पंचनामा सुरू आहे मात्र आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही.

पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->