![]() |
आरमोरी तालुक्यातील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या |
आरमोरी तालुक्यातील मेंढा (वडेगाव) येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याची दुपट्टाच्या साह्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक 11/7/2021 ला रात्रौ अंदाजे 12.00 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार: सदर युवक हा आरमोरी तालुक्यातील रहिवासी असून त्यांची शेती हि जवळील मेंढा या ठिकाणी असल्यामुळे अनके दिवसापासून तो मेंढा येथील एक स्थायिक झाला होता.
हेही वाचा: चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
आता पावसाची सुरुवात झाली असून तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडलंय. त्यामुळे शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून तो रोज शेतावर जायचा पण काल दिनांक 11/7/2021 ला सकाळपासूनच तो घरी न आल्याने त्याची पत्नी गावातील नागरिकांना आपला पती न आल्याचे सांगितले. त्याचवेळी गावातील नागरिकांनी त्यांचा शेतात जाऊन शोधाशोध केली परंतु त्याचा अद्यापही पत्ता लागला नाही.
नंतर मृतकाचे भाऊ मेंढा येथे येऊन त्यांनीसुद्धा गावातील लोकांना घेऊन रात्रौ शोधाशोध केली त्यावेळेस त्यांना त्यांच्यास शेतामध्ये दुपट्टाच्या साह्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
हेही वाचा: चंद्रपुरात गोळीबार! चंद्रपूरमध्ये भर दिवसा गोळीबार, एक जण जखमी
सदर व्यक्तीला पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे. आत्महत्येचा कारण अजून पर्यंत कळालेला नाही. प्रेत पोस्टमार्टम करण्यासाठी आरमोरी येथे हलविण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.