२२ वर्षीय नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार | बातमी एक्सप्रेस

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,२२ वर्षीय नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,२२ वर्षीय नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,नराधमाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार,
आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

वणी: २२ वर्षिय नराधमाने आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजुर कॉलरी येथे दि.१२ जुलै ला सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली असून आरोपी व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव मोहंमद आरिफ नसिब खान(२२) रा.राजुर (कॉ) असे आहे. 

हेही वाचा: #Suicide: आरमोरी तालुक्यातील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सविस्तर वृत्तांत असे कि, आठ वर्षीय पीडित मुलगी घराजवळील रेल्वे रोडच्या जवळील झुडुपात शौचास करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी २२ वर्षिय नराधमाने तिला एकटी पाहतास तिथ जाऊन त्या चिमुकलीवर अत्याचार केला.

चिमुकलीने घरी येऊन सदर घटने विषयी सम्पुर्ण माहिती आपल्या आई व वडीलांना सांगितली. त्यानुसार पिडीतीच्या आई व वडिलानीने वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव,सहा,पोनी माया चाटसे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथक ,पोउनी/टिपुर्णे, यांनी आरोपीला तात्काळ अटक केली. 

हेही वाचा: चंद्रपुरात गोळीबार! चंद्रपूरमध्ये भर दिवसा गोळीबार, एक जण जखमी

आरोपी विरुद्ध भादंवी ३६६ (अ),३७६(अ)(ब) सह कलम बाल लैंगिक अत्याचार (पोस्को)च्या कलम ४,६ व अनुसूचित जाती जमाती (ॲट्रासिटी ॲक्ट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरुच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.