लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट! ई-केवायसी न केल्यास दोन महिन्यांचे पैसे अडकणार | Batmi Express

ladki bahin yojana,e-kyc update,e-kyc last date 31 march 2026,maharashtra government scheme,women beneficiary scheme,february march installment,

ladki bahin yojana,e-kyc update,e-kyc last date 31 march 2026,maharashtra government scheme,women beneficiary scheme,february march installment,ladki bahin payment update

मुंबई :
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत काही चुका झालेल्या लाभार्थी महिलांना ती दुरुस्त करण्यासाठी शासनाने आणखी एक संधी दिली आहे. अशा महिलांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत पुन्हा ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत ई-केवायसी न झाल्यास संबंधित महिलांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन महिन्यांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. (ladki bahin yojana,e-kyc update)

दरम्यान, या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे प्रलंबित हप्ते एकाचवेळी देण्याची तयारी सरकारकडून दर्शवण्यात आली आहे. त्यानुसार, या दोन्ही महिन्यांचे पैसे पुढील महिन्याच्या १५ तारखेपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, किंवा उशिरात उशिरा १५ एप्रिलपूर्वी ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाऊ शकते.

लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात जमा झाला होता. त्यानंतर लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या. आता मात्र फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळण्याची शक्यता असल्याने लाभार्थींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.