भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी दिनांक 03/07/2026 रोजी रात्रो 08.00 वा. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहिती नुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवून 1,343 क्युमेक्स करण्यात आल होत पण आज दिनांक 04/07/2026 रोजी सकाळी 09.00 वा. विसर्ग वाढवून 3706.98 क्युमेक्स करण्यात आल आहे. विसर्ग मध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Gosikhurd National Project (GSK)
- Date : 04-07-2026, @09:00 Hrs.
- Level : 242.860 m (FRL : 245.500 m)
- GS : 669.793 MCM (58.44%)
- LS : 263.886 MCM (35.65%)
Inflow & Ouflow 1 Hourly:
- IF : 10.250 MCM / 2848.00 m³/sec
- OF : 10.250 MCM / 2848.00 m³/sec
- Trend : Steady ( 0 cm in 1 Hr)
Gate Position : 33 Gate Open By 0.5m.
- Spillway : 3546.98 m³/sec
- PH : 160 m³/sec
- RBC PH : Close.
Total Discharge in River :
- 3706.98 m³/sec (130911 Cusec)
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.
सूचना : आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.