सोर्स: गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI
भंडारा (Bhandara Gosikhurd Dam): गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसापासून अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट उघडण्यात आले असून वैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काल धरणाचे 9 गेट उघड्यांत आल होत पण आज सकाळी धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आले आहेत.
सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.