देसाईगंज-कोंढाळा मार्गावर भीषण अपघात; तरुण कंत्राटदाराचा मृत्यू | Batmi Express

Be
0

wadsa accident,Desaiganj,Desaiganj News,wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,

कोंढाळा (गडचिरोली) : देसाईगंज येथून काम आटोपून दुचाकीने गावाकडे परतत असताना एका तरुण बांधकाम कंत्राटदाराचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (३ मे) दुपारी सुमारे ३.३० वाजता देसाईगंज-कोंढाळा मार्गावर लहरी कारखान्याजवळ घडली. गुरुदेव दिनाजी वसाके (वय ३८, रा. कोंढाळा, ता. देसाईगंज) असे मृताचे नाव आहे.

माहितीनुसार, गुरुदेव वसाके हे देसाईगंज परिसरात घर बांधकामाची कंत्राटे घेत होते. सध्या गांधी वार्डात सुरू असलेल्या कामानिमित्त ते रविवारी बांधकामस्थळी गेले होते. बाजाराचा दिवस असल्याने त्यांनी मजुरांचे वेतन देऊन दुपारच्या सुमारास दुचाकीने एकटेच गावाकडे प्रयाण केले.

गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लहरी कारखान्याजवळ, देसाईगंज-आरमोरी मार्गावर त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेशी जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आणि वसाके रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने देसाईगंज येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अपघातात सहभागी रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

गुरुदेव वसाके यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. या आकस्मिक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->