नागपूर दुहेरी आत्महत्या प्रकरणाला वळण; हुंडा छळाच्या आरोपांवरून पाच जणांवर गुन्हा | Batmi Express

Be
0

Nagpur,crime in nagpur,Nagpur  news,Nagpur Marathi News,Nagpur Murdered,Nagpur Murder

नागपूर
: नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात १ मे २०२६ रोजी सकाळी आई व मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला ही घटना नैराश्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तपासात नव्या बाबी उघड झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

मृतांमध्ये संगीता श्रीराम ढबाले (वय ५२, रा. व्यंकटेशनगर) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रम्हे (वय २८, रा. ओमनगर, सक्करदरा) यांचा समावेश आहे. संगीता या शिक्षिका होत्या, तर आकांक्षाने अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी आकांक्षाचा विवाह लोकेश ब्रम्हे याच्याशी झाला होता.

तपासादरम्यान नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सासरच्या मंडळींकडून आकांक्षाचा छळ होत असल्याचे सांगितले. हुंडा तसेच इतर कारणांवरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात आकांक्षाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती लोकेश ब्रम्हे, सासरा सुधाकर ब्रम्हे, सासू अनुसया ब्रम्हे तसेच नणंद आणि तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पुढील चौकशीत हे प्रकरण छळाशी संबंधित असल्याचे समोर आले.

माहितीनुसार, प्रसूतीनंतर झालेल्या घटनेवरून तसेच इतर कारणांमुळे आकांक्षाला सासरी त्रास दिला जात होता. त्यानंतर ती आईकडे राहायला आली होती. याच पार्श्वभूमीवर दोघींनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->