'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आत्महत्यांचा वीस वर्षातील उच्चांक | बातमी एक्सप्रेस

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,आत्महत्या,

Chandrapur News:
 चंद्रपूर जिल्ह्यात मागील वीस वर्षात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब शासनाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मागील वर्षभरात जवळपास ६९ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपविले असून यावर्षी वर्षभराचा आकडा या ६ महिन्यातच गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जानेवारी ते जून या ६ महिन्यात तब्बल ५२ शेतकर्‍यांनी नापिकी, कर्जबाजारी संकटामुळे आत्महत्या केली आहे. आणखी ६ महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दुपटीने वाढण्याची भीती नाकारता येत नाही. 

हेही वाचा: चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांकडे शासनाने अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात मागील वर्षी २०२० मध्ये ६९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. 

यातील ३९ जणांच्या कुटूंबांना पात्र ठरवल्याने प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली. तर २९ जण अपात्र ठरले, तर एक प्रकरण फेरचौैकशीमुळे प्रलंबित आहेत. तर २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात १२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

हेही वाचा: मागील 24 तासात 26 कोरोनामुक्त 20 पॉझिटिव्ह तर ब्रम्हपुरी मध्ये एक पॉसिटीव्ह सापडला

दरम्यान, ही सर्व प्रकरणे कार्यवाहीसाठी प्रलंबित असून जिल्ह्यात दारुबंदी उठवण्यासाठी सरकारने जशी आत्मीयता दाखवली, तशीच शेतकरी प्रश्नांवर दाखवली तर शेतकऱ्यांचेही भले होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×