भंडारा :- वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तुमसर तालुक्यातील रेंगेपार (पांजरा) येथे घडली.आस्तिक नंदकुमार दमाहे (वय 19 वर्षे), रा. बपेरा असे मृत तरुणाचे नाव आहे.
आस्तिक हा आपल्या मामाच्या घरी लग्नासाठी रेंगेपार येथे आला होता. दरम्यान,मित्रांसोबत वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेला होता. आंघोळ करताना तो खोल पाण्यामध्ये गेला. त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. दरम्यान सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्याने नदीपात्रात मासेमारी करणारे लोक धावत येऊन आस्तिकला पाण्याच्या बाहेर काढले.
Read Also: भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू
यानंतर आस्तिकला उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिहोरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय तुमसर येथे रवाना केले आहे.