तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Breaking! भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू | Batmi Express

Nashik,Nashik News,Drowned,Drowned News,Nashik Drowned News,

Nashik,Nashik News,Drowned,Drowned News,Nashik Drowned News,

नाशिक
:- नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील धरणावर गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

पाच जणांच्या मृत्यूने गोसावी वाडीमध्ये शोककळा पसरली आहे. दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र अंदाज न आल्याने ते बुडू लागले तेव्हा इतरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण उलटच घडलं. सर्वांचा म्हणजेच पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अनस खान दिलदार खान, वय 17 वर्ष, नाझिया इमरान खान, वय – 15 वर्ष, मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष, हनीफ अहमद शेख, वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय 14 वर्ष या सर्वांचा बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असुन नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. सर्वांचा मृत्यु झाल्याने या सर्वांना पाण्या बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेवुन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.