अहमदनगर:- अहमदनरगमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी चालवण्यात आलेली बोट बुडाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उजनी दुर्घटना बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून गेले होते.
Read Also: भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू
मात्र बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता झाले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.