चंद्रपूर: 12 वी च्या परीक्षेत बालगृहातील विद्यार्थ्यांचे यश | Batmi Express

Be
0
Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,Chandrapur Live,Chandrapur News Live,

चंद्रपूरदि. 24 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय व स्वयंसेवी बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके जसे अनाथबेवारसपरित्यागीतहरवलेलेबालकांना बाल कल्याण समितीचंद्रपूर यांचे आदेशान्वये दाखल करण्यात येते. सदर बालगृहात 0 ते 18 वर्षे  वयोगटातील प्रवेशित बालिकांना शासनाद्वारे निवासपोषण आहार तसेच शैक्षणिक  सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.

उपलब्ध संसाधनाचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअतंर्गत जिल्ह्यातील जिजामाता बालगृहगडचांदुर येथिल 2 बालिका तसेच स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा येथिल 2 बालकांनी कुठलेही ट्युशन न लावता 12 वी च्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे. या यशाकरिता बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲङ क्षमा बासरकर,  सदस्य वनीता घुमेॲड.अमृता वाघडॉ ज्योत्स्ना मोहितकर तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईतजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरकायदा व परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक प्रिती उंदीरवाडेव जिल्हा बाल संरक्षण कक्षजिल्हा चाईल्ड लाईनचंद्रपूर येथिल अधिकारी व कर्मचा-यांनी बालकांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->