चामोर्शी:- आष्टी- आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत 60 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.
महादेव मडावी वय 60 वर्ष रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत ईसमाचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आष्टीकडून आलापल्ली कडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने चौडमपल्ली येथे पायी रस्त्याने जात असलेल्या महादेव मडावी यांना जबर धडक दिली. यात महादेव मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पिक अप चालक वाहन घेऊन पसार झाला असून घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. व मृतकाला शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.