Chandrapur Accident: हायवाची दोन दुचाकींना धडक, तिघांचा जागीच मृत्यू | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Accident News,Gondpipari,

चंद्रपूर:-
 चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असून सुरजागडला लोह खनिज आणण्यासाठी निघालेल्या हायवाने दोन दुचाकींना धडक दिली. कोठारी मार्गावरील अक्सापूर येथील मंदिरासमोर झालेल्या या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी गोंडपिंपरी येथून चंद्रपूर मार्गे जात असताना विरुद्ध दिशेने सुरजागडला लोह खनिज आणण्यासाठी निघालेल्या हायवाने दुचाकींना उडवे. या धडकेत दुचाकीवरून तिघांचा मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा. विजनगर मुलचेरा, जि. गडचिरोली, अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर, मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर मुलचेरा, जि. गडचिरोली असे आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले आहेत. हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->