गडचिरोली : ०५ जुलै २०२३ वार बुधवार रोजी गोंडवाना विद्यापीठात (Gondwana University) होणा-या दिक्षांत समारंभासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (India President Droupadi Murmu) उपस्थित राहणार आहेत.
महामहीम राष्ट्रपती यांच्या दौ-यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन गडचिरोली पोलीस दल सज्ज झाले असुन त्याकरीता तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये १५१ अधिकारी, ६३९ पुरुष व महिला अंमलदार, ८ एस. आर. पी. एफ. चे प्लाटुन, ११ सि-६० चे पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग व ईतर असे १५०० अधिकारी/अंमलदार तैनातीस आहेत.
महामहीम राष्ट्रपती व अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी वापरण्यात येणारा कोटगल टी- पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट हा मार्ग सामान्य नागरीकांना 05 जुलै 2023 चे पहाटे ०५.०० वा. पासुन सायंकाळी १७.०० वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, आपण सदर मार्गाचा वापर न करता पर्यांयी मार्गाचा वापर करावा.