वडसा: घरगुती वादातून दोन SRPF जवानांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात असेलेल्या वडसा (देसाईगंज) तालुक्यातील विसोरा SRPF कॅम्प मध्ये ३ जुलै रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सदर घटनेने पोलीस प्रशासनात एकचं खळबळ उडाली आहे.सुरेश मोतीलाल राठोड (३०) असे मृतकाचे नाव आहे. आरोपीचे नाव मारोती संभाजी सातपुते (३३) असे आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या घटनेतील आरोपी आणि मृतक हे विसोरा येथील SRFP कॅम्प मध्ये कार्यरत असून घरगुती वादातून ३ जुलै च्या रात्रो दोघात भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने आरोपी मारोती सातपुते याने सुरेश राठोड वर चाकूने हल्ला केला यात सुरेश राठोड चा मृत्यू झाला. घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली असता घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले व मृतदेह शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले. याप्रकरणी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी इनामदार यांनी ‘The गडविश्व’ शी बोलतांना दिली. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे.