मुंबई : अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. त्यांची नावे देखील समोर आली आहेत.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.