Gadchiroli News | पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते पार पडले गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन - Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli
पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते पार पडले गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन

गडचिरोली ( Gadchiroli News ) :  जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणेकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक लाखापेक्षा जास्त नागरीकांना विविध योजना मिळवुन देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचे उद्देशाने दिनांक-01/03/2022 ते दिनांक 02/03/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातुन जिल्ह्रात पहील्यांदाच “भव्य गडचिरोली महोत्सवाचे” आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले असुन, सदर महोत्सवाचे उद्घाटन मा. ना. एकनाथजी शिंदे, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) तथा पालकमत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते पार पडले.

गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेला भव्य गडचिरोली महोत्सव दोन दिवस चालणार असुन, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट तसेच संस्थांनी आपले उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले आहेत. यासोबतच विविध हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकांना पहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. पालकमंत्री श्री. एकनाथजी शिदे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाचे वतीने जिल्हयात पहील्यांदाच गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करुन, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली महोत्सवाकरीता अथक परीश्रम घेत असलेले मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. तसेच त्यांच्या टीमचे मनपुर्वक व भरभरुन कौतुक केले. अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव दरवर्षी आयोजित करावे. यामधुन दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमातुन गडचिरोलीतील युवक-युवतींना एक व्यासपीठ उपलब्ध होवुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे सांगुन, गडचिरोली जिल्हयातील खेळाडुंकरीता विविध खेळाच्या साहित्यांसह सरावाकरीता क्रिडा संकुल उभारले जाणार आहे. त्या माध्यमातुन क्रिडा क्षेत्रातील खेळाडु तरुण-तरुणींना उच्च पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळु शकेल असे सागिंतले. यावेळी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाकरीता मिरज व मुंबई येथील महाविद्यालयात निवड झालेल्या 1) सुरज पुंगाटी व 2) विजय ओक्सा या गडचिरोली जिल्हयातील रहीवासी असलेल्या आदिवासी विद्याथ्र्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रु.ची मदत देवुन गौरविण्यात आले.

सदर गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मा. श्री. अजय कंकडालवार, अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र कॅम्प नागपूर श्री. संदीप पाटील सा., मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीणा सा., मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुमार आशिर्वाद, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे,मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. अनुज तारे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.