4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 21 वर्षीय मुलाने केले लैंगिक शोषण
चिमूर: - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक. 27/02/2022 रोजी तक्रारदार हि शेतावर कामाकरीता गेली असतांना घरी हजर असलेल्या तिच्या 04 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस आरोपी निखील रमेश पिंपळकर वय 21 वर्षे रा. गदगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर याने अल्पवयीन मुलीस चॉकलेट व केक देण्याचे आमीष दाखवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. ( A 21-year-old boy sexually abused a 4-year-old girl )
सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन चिमुर येथे प्राप्त तक्रारीवरुन अपराध क्रमांक 67/2022 कलम 376(1), 376(AB) भारतीय दंड संहिता तसेच कलम 4 लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन 2012 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली असुन संजय सांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर, मनोज गभने पोलीस निरीक्षक पो.स्टे.चिमुर यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक दंडवते या गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.