'
30 seconds remaining
Skip Ad >

दुर्देवी! शौचालयाची टाकी साफ करताना चौघांचा मृत्यू - Batmi Express

0

शौचालयाची टाकी साफ करताना चौघांचा मृत्यू 

पुणे : 
पुण्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.शौचालयाची टाकी साफ करत असताना वाचवण्याच्या प्रयत्नात टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

मृतांमध्ये दादा पोपट कसबे (वय 45), पद्माकर मारुती वाघमारे (वय 43), कृष्णा दत्ता जाधव (वय 26, रा. देगाव ता. उत्तर सोलापूर सोलापूर) आणि रूपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे (वय 45 रा. घोरपडे वस्ती कदम वाक वस्ती मुळगाव केळेवाडी-ता. वाशी. जिल्हा उस्मानाबाद) या चौघांचा समावेश आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासा जवळ असलेल्या परिसरात ही घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात कदमवाक वस्ती जवळ असलेल्या त्याचा हॉटेलच्या पाठीमागे जय मल्हार कृपा सोसायटीमध्ये शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम सुवर्ण कांबळे व यश दादा कसबे यांना दिले होते.

बुधवारी सकाळी टाकीची स्वच्छता करत असताना चौघांपैकी कृष्णा जाधव शौचालयाच्या टाकीत पाईप सरकवत असताना तोल जाऊन पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दादा कसबे देखील टाकीत पडले. या दोघांना वाचण्यासाठी सुवर्ण कांबळे हे टाकीत उतरले.

पंधरा मिनिटाहून अधिक काळ टाकीतून कोणीच बाहेर येत नसल्याचे पाहून टाकीच्या शेजारच्या खोलीत राहणारे भाडेकरू पद्माकर वाघमारे यांनीही टाकीकडे धाव घेतली आणि ते देखील या टाकीमध्ये पडले. टाकीत मोठ्या प्रमाणावर घाण आणि जास्त असल्याने गुदमरून या चौघांचा देखील या घटनेत मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाघोली फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या चौघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनेबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×