'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! मंदिरातच बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार - Batmi Express

0

Satara,crime Satara,Satara Crime,Satara LIve,Satara Live Coverrage,Satara LIve News,Satara Marathi News,Satara news,Satara Today,Satara,
मंदिरातच बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार 

सातारा (Satara ) 
: एका मंदिरातच बारा वर्षांच्या मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली असून, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ( Twelve year old girl tortured in the temple

हे देखील वाचा:

भर दिवसा सात वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य : पोलिसांनी केलं तरुणाला अटक

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी ९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन.

हे देखील वाचा:

१९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.  ही घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला. त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×