तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Beed Accident: जीवलग मित्रांवर काळाचा घाला, बाईक अपघातात तीन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू - Batmi Express

Beed,Beed Accident,Beed News,Accident,Accident News,Accident News Live,Maharashtra,

Beed,Beed Accident,Beed News,Accident,Accident News,Accident News Live,Maharashtra,
बाईक अपघातात तीन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू


बीड  ( Beed Accident ): बीड जिल्हा रुग्णालय परिसरात हुंदके आणि अश्रूमुळे वातावरण सुन्न झालं आहे. कारणही तसंच आहे. आहेर वडगाववरून तीन मित्र बुलेटवर बसून बीडकडे जात असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. तीन जीवलग मित्र एकाच वेळी मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. 

बीडकडे जात असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसनं बुलेट वरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली.  यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्रानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 

तीन जिवलग तरुण मित्रांचा भीषण अपघात झाल्यानं मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. अचानक तिन्ही मित्रांची झालेल्यांची हे मन सुन्न करणारी होती.  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ रात्रीच्या सुमारास घडली. पारसनाथ मनोहर रोहिटे (वय २२), कृष्णा भारत शेळके (वय २३), अक्षय सुरेश मुळे (वय २२) अशी मयतांची नावं आहेत. 

हे तिघं बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन जात होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसनं जोराची धडक दिली.  यामध्ये पारसनाथ आणि कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. 

औरंगाबाद आगाराची औरंगाबाद-लातूर बस ही बीडहुन लातूरकडे जात होती. अचानक समोरून दुचाकी आल्यानं चालकाचा एसटीवरचा ताबा सुटला यावेळी बसनं दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघंही गंभीर जखमी झाले. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.