सुगंधित तंबाखू विरोधात धडक कारवाई: आरमोरी पोलिसांची धडक कारवाई
आरमोरी : सुगंधित तंबाखुची साठवणूक केली असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर आरमोरी पोलिस पथकाने मुंगळवारी देऊळगाव येथील एका व्यक्तीच्या घरी राबविलेल्या धडक कारवाईत सुगंधित तंबाखुसह ६३ हजारांवर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र विठोबा सहारे (३२) रा. देऊळगाव यास अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या बिमोड करण्याच्या धोरणांतर्गत पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई राबवण्यात येत आहे.
देऊळगाव येथील आरोपी जितेंद्र सहारे यांचे घरी सुगंधित साठवणूक केल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक कांचन ऊईके, पोलीस अमलदार प्रकाश जाधव, सुमित बरडे, समीर कांबळे, शैलेश तोरपकवार आदींनी पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांचन उईके करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.