'
30 seconds remaining
Skip Ad >

Free Fire – ऑनलाईन गेमसाठी मुलांनी चोरली आई-वडिलांची चैन, फ्री फायरच्या वेडापायी घरातून उडवले २० हजार रुपये, इतकंच नाही तर १४ हजारांचे मोबाईल रिचार्ज

0

Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमसाठी मुलांनी चोरली आई-वडिलांची चैन, फ्री फायरच्या वेडापायी घरातून उडवले २० हजार रुपये,Game,Online Game,Free Fire
फ्री फायरच्या वेडापायी घरातून उडवले २० हजार रुपये

छत्तरपूर
: ऑनलाईन गेमच्या (Online Game) वेडापायी मुलं कशी बिघडू शकतात, याचं एक उदाहरण छत्तरपूरमध्ये (Chattarpur) पाहायला मिळाले आहे. फ्री फायरच्या (Free Fire) वेडापायी शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनी स्वत:च्याच घरात चोरी करण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Online Gaming Addiction) यातील एका मुलाचे वय १६ वर्ष आणि दुसऱ्याचे १२ वर्ष आहे. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी त्यांची घरात हळूहळू २० हजारांची चोरी (20 Thousand Theft From Home) केली. घरातील आई आणि वडील या दोघांच्याही गळ्यातील सोन्याच्या चेन त्यांनी चोरल्या. नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी चेन विकण्याचा प्लॅन होता. पालकांना हे कळेपर्यंत, या दोन्ही मुलांनी १४ हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज ( 14 Thousand Mobile Recharge ) केले होते.

हे देखील वाचा:

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या! 

दोघेही एकमेकांचे मित्र
ही दोन्ही मुले शेजारी शेजारी राहतात. दोघांमध्येही चांगली मैत्री आहे. कोरोना काळात दोघेही एकत्र ऑनलाईन क्लाससाठी बसत असत. क्लाससाठी हातात मिळालेल्या मोबाईलमध्ये फ्री फायर गेम खेळण्यास ते शिकले. या ऑनलाईन गेमची चटक लागल्यानंतर, मोबाईल रिचार्जसाठी त्यांनी हळूहळू आपल्या घरांतून पैसे चोरी करण्यास सुरुवात केली.  घरातून पैसे गायब होतायेत हे लक्षात आल्यावर, पालकांनी कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. या रेकॉर्डिंगमध्ये लक्षात आले की पैसे मुलेच चोरी करीत आहेत. १२ वर्षांच्या मुलाने सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या घरातून आईची चार तोळ्यांचा हार आणि वडिलांची चेन चोरली होती. दोघांनी मिळून आपआपल्या घरातून आत्तापर्यंत २० हजार रुपये चोरले आहेत.

गेममधील हत्यारे अपडेट करण्यासाठी लागतात पैसे:
फ्री फायर गेम हे १० मिनिटांचे युद्ध असते. यात युझर्सना नवनवी हत्यारे खरेदी करण्याची संधी असते. मित्रांसोबत फ्री फायर गेम खेळता येतो. टीमसोबत खेळणे युझर्सना चांगलेच आवडतेही. गेम खेळण्यासाठी आणि अपग्रेड करण्यासाठी पैसे द्यावे लागतात.

रुपये हरल्याच्या तणावात एका मुलाची आत्महत्या:
दुसऱ्या एका प्रकरणात छत्तरपूरमध्येच २० जुलै २०२०मध्ये एका १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेमिंगमध्ये हरल्यामुळे आतम्हत्या केल्याची घटना घडली होती. ४० हजार रुपये हरल्याने हा मुलगा तणावात आला होता. या मुलाचे आई-वडील दोघेही सुशिक्षित सून नोकरदार आहेत. त्यांचा हा मुलगा ऑनलाईन क्लासेसच्या काळात गेमिंगच्या नादी लागला होता. गेमिंगमध्ये पैसे लावूनही खेळण्याचा पर्याय आहे. त्याच्या सुसाईड नोटमध्ये ४० हजार हरल्याचा उल्लेख या मुलाने केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×