तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या! - Batmi Express

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या!,14 Year Old Boy Killed His Whole Family Under Pubg Influence,

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या!,14 Year Old Boy Killed His Whole Family Under Pubg Influence,

पब्जी (PUBG) गेमच्या नादात एका १४ वर्षीय (14 Year Old Boy Killed His Whole Family Under Pubg Influence) अल्पवयीन मुलानं आपल्याच कुटुंबाला संपवल्याचं समोर आलं आहे.

पब्जी (PUBG) गेम खूप लोकप्रिय आहे. पब्जी गेमच्या अनेक दुष्परिणामांमुळे भारतात या गेमवर बंदी (PUBG Banned In India) घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील या गेममुळे जगभरातल्या तरुणाईला आणि लहान मुलांना वेडं करून सोडलं आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) अशीच एक भीषण घटना घडली आहे. या गेमच्या नादात एका १४ वर्षीय (14 Year Old Boy Killed His Whole Family Under Pubg Influence) अल्पवयीन मुलानं आपल्याच कुटुंबाला संपवल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानच्या लाहोरमधील काहन भागामध्ये गेल्या आठवड्यात ४५ वर्षीय नाहिद मुबारक, त्यांचा २२ वर्षांचा मुलगा तैमुर आणि त्यांच्या इतर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात सापडले. एकाच कुटुंबातल्या चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या सर्व कुटुंबात सर्वात लहान १४ वर्षीय अल्पवनीय आरोपी जिवंत राहिला होता. त्यामुळे पोलिसांनाही संशय आला. या मुलाची चौकशी केल्यावर सगळा प्रकार समोर आला. १४ वर्षांच्या मुलाचे प्रताप पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पब्जी गेमच्या आहारी जाऊन त्याच्याच प्रभावाखाली आई, मोठा भाऊ आणि दोन बहिणींची हत्या केल्याची कबुली या मुलानं दिली आहे. दिवसभर अनेक तास पब्जी गेम खेळल्यामुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला होता, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.

हत्येच्या दिवशी आरोपी मुलाचं त्याच्या आईशी पब्जी खेळण्यावरून भांडण झालं होतं. मोबाईल गेम खेळण्यामध्ये जास्त वेळ न घालवता अभ्यासाकडे लक्ष देण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर रागाच्या भरात या मुलानं आईच्या कपाटातून पिस्तुल काढलं आणि आपल्या आईवर, तसेच झोपलेल्या तिघा भावंडांवर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी मुलानं कांगावा करत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं भासवलं. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर हे सगळं प्रकरण स्पष्ट झालं.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.