'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर | पतंग कापण्याच्या नादात आदित्यला विजेचा जोरदार धक्का | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Warora,

वरोरा
:- कॉईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर तारेने पतंग उडवणे चंद्रपूर जिल्ह्यातील बालकाला महागात पडले. पतंग उडविताना कॉपर मांजाचा उच्च दाब विजवाहक तारांना स्पर्श झाल्यावर जोरदार धक्का लागल्याने आदित्य येटे नामक 11 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे.

हे देखील वाचा:

चंद्रपूर | युवकांनी देशसेवा करण्यासाठी सदैव तत्पर रहावे- डॉ.मंगेश गुलवाडे

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरानजीकच्या बोर्डा परिसरात ही धक्कादायक घटना उजेडात आली. महापारेषण अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने कॉपर तारांचे पतंगबाजीसाठी वापरले जाणारे रीळ व अन्य साहित्य ताब्यात घेतले. कॉपर तारांचा स्पर्श झाल्याने या भागातील वीज पुरवठा काही क्षणांसाठी खंडित झाला होता.

दरम्यान जखमी अवस्थेतील आदित्य येटे याला चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. या घटनेनंतर पतंगबाजीत दंग असलेल्या आपल्या चिमुरडयांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×