कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
भंडारा ( Bhandra ) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये सुरू झाले आहेत. शाळेत आणि कॉलेजमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची लगबग दिसू लागली आहे. पण त्याच दरम्यान भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Bhandara College Hsc Class Student Commits Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजमधून घरी येताच त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विद्यार्थी हा 18 वर्षीय असून तो भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 12वीत असलेल्या या तरुणाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एकुलता एक मुलगा असलेल्या मुलाच्या आत्महत्येच्या वृत्ताने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहित मुंबईतील तरुणीची आत्महत्या जोगेश्वरीत एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असे लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे. जानेवारी महिन्यात हा प्रकार उघडकीस आला. ही तरुणी जोगेश्वरी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचं निधन झाल्यानं तिच्या मोठ्या भावाचे लग्न लावून देण्यात आले. हा भाऊ सध्या विरारला असतो. तिचे वडील फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे. याच कारणामुळे अनेकदा ती घरी एकटीच असायची.