चंद्रपूर | चंद्रपूरचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांच्या कारचा अपघात | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur Accident News,Warora,

वरोरा
:- नागपूर-चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथील पेट्रोल पंप समोर नागपुर वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेचे नगसेवक दीपक जयस्वाल यांच्या गाडीचा समोरून अचानक टीप्पर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. (Chandrapur corporator Deepak Jaiswal's car accident

हे देखील वाचा:

आत्महत्या |  गडचिरोलीत महिला पोलिस शिपायाची आत्महत्या

गाडीने रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात मोठी हानी झाली नसली तरी दिपक जयस्वाल यांचे चालक यांना डोक्याला दुखापत झाली आहे. तर दुचाकीस्वार रमेश चंद्रभान जेणेकर रा . पिचदुरा हे किरकोळ जखमी झाले आहे . जखमींना उपचारांसाठी वरोरा येथे हलविण्यात आले. धडक एवढी जोरदार होती की चंद्रपूर दिशेने जाणाऱ्या कारने नागपूर मार्गावर वळण घेतली होती. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी जयस्वाल यांच्या गाडीचे मोठें नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->