Instagram Thergaon Queen Arrested | इंस्टाग्रामवर अश्लील भाषेमध्ये व्हिडिओ बनवणारी 'थेरगाव क्वीन' ला अटक - Batmi Express

Be
0

Instagram Thergaon Queen Arrested,Instagram Queen Arrested,Pune,Pune News,Pune Latest News,Pune Live,Social Media,

पुणे:- 
सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ (Thergaon Queen ) नावाने अकाऊंट चालविणाऱ्या दोन मुलींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या!

शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हे अश्‍लिल भाषेचे व्हिडिओ पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या मोबाईलवर आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. कुणाल कांबळे (रा.गणेशपेठ, पुणे) आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी शनिवारी (दि.29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे राहणारी मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ या नावाने अकाऊंट चालविते. तिने आणि इतर दोन आरोपींनी मिळून अश्‍लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर टाकले. 

तसेच ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->