आत्महत्या | गडचिरोलीत महिला पोलिस शिपायाची आत्महत्या - Batmi Express

Be
0

महिला पोलिस शिपायाची आत्महत्या ,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,suici

गडचिरोली ( Gadchiroli ):
- गडचिरोली पोलिस ( Gadchiroli Police ) वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलिस शिपायाने (Female Police Constable ) विष प्राशन ( Poison ) करून आत्महत्या (Suicide )  केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा:

PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या!

प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. मृत महिला पोलिस शिपाई प्रणाली काटकर गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलिस शिपाई संदीप पराते यांच्याशी दोन वर्षांपूर्वी झाले होते. ते सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे प्रणाली काटकर या संदीप पराते यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या दोघांत सातत्याने वाद व्हायचे. शनिवारी देखील दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं प्रणाली काटकर यांनी टोकाची भूमिका घेऊन विष प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच पती संदीप पराते यांनी त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोर्हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->