Bramhapuri: हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल; वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा - Batmi Express

हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल

ब्रम्हपुरी
:- ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसा अगोदर वन्य हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दोन-तीन दिवसा- आगोदर पंधरा ते विसच्या संख्येने असलेल्या हत्तीचा कळप देसाईगंज ( वडसा) तालुक्यातील उसेगाव कोंडाळा परिसरात आढळून आला.

हत्तींचा कळप लागूनच असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या वैनगंगा नदी पात्र करीत ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव खरकाडा निलज शेतशिवारात दि. 8 डिसेंबर ला रात्रौ 8 ते 9 वाजताच्या सुमारास दाखल झाला असून हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तोबा गर्दी केली.

 (ads1)

वन कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना पांगविण्यात येत आहे तर हत्तींच्या हालचालीकडे ब्रह्मपुरी वन विभागातील अधिकारी वन कर्मचारी ग्रस्त देत आहेत. पिंपळगाव खरकडा निलज परिसरात हत्ती दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.