ब्रेकिंग! सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन - Batmi Express

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन ,India News,IndiaNews,News India,

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन ,India News,IndiaNews,News India,

भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत ( Bipin Rawat ) यांचा मृत्यू झाला आहे.  सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General  Bipin Rawat ) यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General  Bipin Rawat ) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते अशी माहिती मिळते आहे. 

कोण होते बिपीन रावत? : 

  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. 
  • लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक. 
  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली.
  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले.
  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट'. 
  • रावत यांचा 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित.
  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.