Chandrapur Msrtc Strike: चंद्रपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना गदारोळ; मंगेश डांगे यांना अटक - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Msrtc Strike

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Msrtc Strike

Chandrapur Msrtc Strike:
 चंद्रपुरात एसटी कामगारांचे नेते मंगेश डांगे यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी एसटी कामगार सेनेच्या काही सदस्यांनी संप मोडत मुख्य एसटी बसस्थानकात एक बस आगारा बाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलक नेते मंगेश डांगे यांच्या नेतृत्वात संपकऱ्यानी ही बस रोखली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी डांगे यांना अटक केलं. 

Read Also: दुचाकीच्या अपघात दोन जण गंभीर जखमी

 (ads1)

यावेळी शेकडो संपकर्ते एसटी कामगार दुर्गापूर पोलिस ठाण्यात जमा झाले. काही काळासाठी दुर्गापूर पोलिस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीस आणि संपकरी एसटी कामगारांमध्ये सामंजस्य घडवत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला गेला.

दरम्यान, अटक झाल्यावरही विलीनीकरण व्हावे ही मुख्य मागणी राज्य सरकारने पूर्ण करावी अशी आंदोलकांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.