Bramhapuri Msrtc Strike: विलीनीकरणाच्या मागणीसाठी ब्रम्हपूरी आगारात ३० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (Msrtc Strike ) सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आव्हान केले. मात्र त्या नंतरही संप सूरूच आहे. आतापर्यंत ब्रम्हपुरी आगारातील ४० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. १५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले असल्याची माहिती आगारप्रमुख भाग्यश्री क़ोडापे यांनी दिली आहे.
Read Also: चंद्रपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना गदारोळ; मंगेश डांगे यांना अटक
(ads1)
तर ३० दिवसांच्या कालावधीत आगाराला १ कोटी ५० लाख रुपयांचा तोटा झाला आहे. ब्रह्मपुरी आगारात ८४ चालक, ९९ वाहक, ३४ यांत्रिकी व २८ प्रशासकीय पदावर असे एकूण २४५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ १२ कर्मचारी आगारात कर्तव्यावर हजर आहेत. तर उर्वरित २३३ कर्मचारी संपात सामील झाले होते.