'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू | चंद्रपूर बातमी एक्सप्रेस

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Generator Leakage Inciden,
दुर्गापूर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू -  फोटो फाईल: पोलिसकाका

चंद्रपूर: 
जिल्हयातील दुर्गापूर येथे जनरेटर चालू असताना गॅसच्या गळतीने एकाच वेळेस कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची मोठी घटना मंगळवारी म्हणजे आज  सकाळी घडली आहे.

जिल्ह्यात अतितीव्र पावसामुळे दुर्गापूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेसाठी जनरेटर सुरु करू ठेवण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्वच जण झोपी गेले आणि गॅस गळती होऊन अतिशय मोठी दुर्घटना घडली. हा प्रकार दिसताच घरा जवळील राहणाऱ्या लोकांनी आरडाओरड केली. ह्या जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलासहीत १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

हेही वाचा: चंद्रपुरात गोळीबार! चंद्रपूरमध्ये भर दिवसा गोळीबार, एक जण जखमी

दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता.

घटनेची माहिती कळताच दुर्गापूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×