Nagpur Youth Suicide: नागपूर शहरात तरुणाने दुचाकीसह उडी घेऊन केली आत्महत्या | बातमी एक्सप्रेस

Nagpur Youth Suicide,Nagpur Youth Suicide News,Nagpur Suicide News,Nagpur Suicide,Nagpur Suicide Latest News,suicide news,suicide,nagpur news,

Nagpur Youth Suicide,Nagpur Youth Suicide News,Nagpur Suicide News,Nagpur Suicide,Nagpur Suicide Latest News,suicide news,suicide,nagpur news,
Nagpur Youth Suicide

Nagpur Suicide:
 नागपूर शहरातील फुटाळा तलाव परिसरात १२-जुलै-२०२१ ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास एका तरुण युवकाने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेमुळे नागपूर शहरात व परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मृतक तरुणाचा नांव अथर्व राजू आनंदेवार (१९) असं आहे. 

हेही वाचा: आरमोरी तालुक्यातील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार: तरुण हा वाडी येथील रहिवासी होता. गेल्या काही दिवसापासून तो नैराश्यात असायचं असं सांगण्यात आलं आहे. खूप प्रयत्न केले नैराश्यात बाहेर निघण्याचे पण मार्ग न निघाल्यामुळे त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 

फुटाळा तलावात अथर्वने दुचाकीसह उडी घेतली. जी दुचाकी घेऊन त्याने तलावात उडी घेतली ती बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. पण त्याचा मृतदेह अजून रेस्क्यू टीमच्या हाती लागलेला नाही. सध्या युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा: चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिस स्टेशन मधील टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून अथर्वने असं टोकाचं पाऊल का उचललं? याचाही शोध पोलीस घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.