गडचिरोली :- पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाली होती पण पाऊस कमी पडत असल्यामुळे पूर ओसरू लागला त्यामुळे बरीचशी मार्गे सुरू झालेली असून अद्याप आज, शुक्रवार 11 जुलै रोजी दुपारी 2 वाजे दरम्यान आठ मार्ग पुरामुळे बंद आहेत. संध्याकाळ पर्यंत संपूर्ण मार्ग सुरळीतरित्या सुरू होतील,अशी शक्यता आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 10.07.2025
वेळ दुपारी 2.00 वा.
1) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353सी (दिना नदी)
2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी
3) देवलमारी व्यंकटरावपेठा मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग तालुका अहेरी (देवलमारी पुल, व्यंकटरावपेठा पूल)
4) बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग तालुका सिरोंचा
5) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
6) चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा 37 तालुका चामोर्शी
7) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 तालुका चामोर्शी
8) वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,- 55 तालुका चामोर्शी