Gadchiroli Flood Updates: पुर ओसरू लागला; आजही 15 मार्ग बंद... एका क्लिक वर जाणून घ्या | Batmi Express

Gadchiroli Floods 2025,Gadchiroli,Gadchiroli Flood,Gadchiroli Flood Live Updates,Gadchiroli Alert,

Gadchiroli Floods 2025,Gadchiroli,Gadchiroli Flood,Gadchiroli Flood Live Updates,Gadchiroli  Alert,

गडचिरोली :- 
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सततच्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. अनेक पक्क्या घरांच्या भिंती ओलसर होऊन घरात आर्द्रता निर्माण झाली होती.  मात्र, बुधवारी 9 जुलैच्या दुपारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, नद्यांमधील पाणीपातळी कमी होऊ लागली असून पूरस्थिती थोडीशी ओसरत आहे.

तरीही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांत पूरामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सध्या 15 मार्ग बंद स्थितीत आहेत. येत्या 24 तासांत हे मार्ग हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.


पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 10.07.2025 

  1. गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी,कोलांडी नाला,गाढवी नदी)
  2. गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला,शिवणी नाला)
  3. आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (दिना नदी)
  4. तळोधी आमगाव रेगडी देवदा रस्ता राज्यमार्ग ३८१ (पोहार नदी)
  5. अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) तालुका अहेरी
  6. हरनघाट चामोर्शी रस्ता राज्यमार्ग ३७० (दोडकुली, दहेगाव नाला)तालुका चामोर्शी
  7. अहेरी देवलमारी व्यंकटरावपेठा मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग तालुका अहेरी (देवलमारी पुल, व्यंकटरावपेठा पूल)
  8. चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
  9. अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
  10. भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला,अनखोडा नाला)तालुका चामोर्शी
  11. वडसा वळण मार्ग प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
  12. चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
  13. खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा ४४ तालुका गडचिरोली
  14. वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,५५ तालुका चामोर्शी
  15. वाघाळा सायगाव शिवणी रस्ता प्रजिमा ३४ तालुका आरमोरी


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.